तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी-पालघर
पालघर जिल्ह्यातील बोईसर-पालघर ( र.जी.) संघाचे वरिष्ठ पत्रकार अध्यक्ष श्री रामप्रकाश निराला यांचा ६५ वा वाढदिवस १ फेब्रूवारी रविवार २०२६ रोजी सेवा भाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मुल्याचे दर्शन घडविणाऱ्या उपक्रमा द्वारे करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात बोईसर चित्रालय मधील हाॅटेल सम्राट येथे केक कापून करण्यात आली. यावेळी उपस्थितांतर्फे श्री रामप्रकाश निराला यांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तदनंतर बोईसर-पालघर पत्रकार संघाचे वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही ” चलो गावकी और ” या संकल्पनेनुसार समाजोपयोगी सेवा अभियान राबविण्यात आले. या सेवा उपक्रमासाठी सर्व पत्रकार, पदाधिकारी ,सदस्य सकाळी १० वाजता श्री संतोषी माता मंदिर आशागड तसेच श्री महालक्ष्मी माता मंदिर विवलवेढा (डहाणू) येथे गरजू लोकांना ब्लॅंकेट, फळे, नास्ता वाटप करण्यात आला. गरजू महिलांना साडया व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजूच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आल्याचे पाहायला मिळाले. वरिष्ठ पत्रकार श्री रामप्रकाश निराला यांचा वाढदिवस केवळ औपचारिक न राहता समाज सेवेच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले की वरिष्ठ पत्रकार श्री रामप्रकाश निराला यांच्या नेतृत्वाखाली राबविले जाणारे असे उपक्रम पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक बळकट करून देते. आणि समाजातील गरजू घटकांसाठी प्रेरणादायी ठरते. या कार्यक्रमासाठी बोईसर-पालघर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री रामप्रकाश निराला यांच्या बरोबर बी. एन शुक्ला, प्रविण पाटील, निलेश नगरकर, मोहन म्हात्रे तसेच सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक समाजसेवक व मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी वरिष्ठ पत्रकार श्री रामप्रकाश निराला यांना दिर्घायुष्य, उत्तम आरोग्य व समाज सेवेच्या वाटचालीसाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.























