वैभव वळसे पा.
ग्रामीण प्रतिनिधी आंबेगाव
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये पापळवाडी येथून कुंडेश्वराच्या देवदर्शनासाठी जात असताना. पिकप गाडीचा भीषण अपघात होऊन नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून विस जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे समजले आहे सदर घटना ही खेड तालुक्यातील पाईट जवळ घडली असुन मृत्युमुखी पडलेले व जखमी झालेले सर्वजण खेड तालुक्यामधील पापळवाडी गावचे रहिवासी आहे.श्रावणी हे सर्व जण तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त पाईट जवळ असणाऱ्या कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना पिकप चालकाचा गाडीवरील ताबा सुटून पिकप खोलदरीमध्ये कोसळली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पिकप गाडीचा चक्काचुर झाला असून नऊ जण जागीच मृत्युमुखी पडले आहे. त्यामध्ये घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी जखमींना चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवले तर काहींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हे सर्व जण पापळवाडी गावचे रहिवासी असून सदर घटनेची माहिती मिळताच पापळवळी गावावर शोककळा पसरली आहे.






















