तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर:- पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच आधुनिक पत्रकारिता कार्य शाळेचे आयोजन दि. ९/९/ २०२५ रोजीकरण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद कार्यालय येथे कोकण विभागीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारिता कार्य शाळेत सोशल मीडियाचा वापर कसा करावा तसेच सायबर गुन्हे वेलनेस आणि अॅप, डिजिटल मिडिया जसे मुख्य विषय घेऊन जिल्हा मुख्या कार्यालयात जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात ” आधुनिक पत्रकारिता कार्य शाळेचे ” आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्य शाळेत उपस्थित प्रमुख मार्गदर्शक मा. श्रीमती डॉ. इंदु राणी जाखड, (भा. प. से) मा. जिल्हाधिकारी पालघर, मा. श्री. मनोज रानडे, (भा.प.से) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, मा. श्री. हेमराज बागुल, मा. संचालक (माहिती) (प्रशासन) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई, मा. श्री. मनोज जालनावाला मा. अध्यक्ष, कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती, मा. श्रीमती अर्चना संभवरकर, मा. उपसंचालक, कोकण विभागीय. तसेच या कार्यशाळेत कोकण मान्यता समिती सदस्य हर्षद पाटील, जिल्हा सुचना अधिकारी ठाणे मनोज सानप, जिल्हा सुचना अधिकारी पालघर राहूल भालेराव, जिल्हा परिषदेचे पीआरओ श्रध्दा पाटील, यांच्या सह अन्य पालघर पत्रकार संघ , पालघर जिल्ह्य मराठी पत्रकार संघ, द प्रेस क्लब ऑफ वसई-विरार, बोईसर-पालघर पत्रकार संघ, पालघर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, वसई तालुका पत्रकार संघ महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना, लोक स्वातंत्र्य पत्रकार महा संघ जव्हार तालुका पत्रकार संघाचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने पत्रकार तसेच मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सी ई ओ जिल्हा मनोज रानडे आणि जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकारांची जबाबदारी आणि प्रशासनाच्या बरोबर असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले तसेच जिल्हाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा केली. प्रमुख प्रवक्ता युवराज आर्य, उन्मेश जोशी, आणि संजय मिश्रा यांनी कार्य शाळेत अनेक पत्रकारितेच्या विषयांवर सविस्तर पूर्वक पत्रकारांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच कार्य शाळेचे सुत्रसंचालन सहा. संचालक संजीवनी जाधव-पाटील व समापन ठाण्याचे जिल्हा सुचना अधिकारी मनोज सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले. तदनंतर सर्व उपस्थितांनी सहभोजनाचा लाभ घेतला.
























