नीता राऊत.
तालुका प्रतिनिधी.पालघर
तारापूरऔद्योगिक क्षेत्र मधील मेसर्स मेडली फार्मा.प्लॉट नंबर एफ १३ मध्ये २१ ऑगस्ट गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास नायट्रोजन टाकीतून गॅस गळती झाल्याने चार लोकांचा मृत्यू झाला असून दोघेजण अस्वस्थ आहेत.
मृत्यू पावलेल्यांचे नाव १)कल्पेश राऊत २)बंगाली ठाकुर ३)धीरज प्रजापति ४) कमलेश यादव .असे असून अन्य दोन कामगार रोहन शिंदे आणि नीलेश हडळ ह्यांना बोईसरमधील शिंदे हॉस्पिटल मध्ये आय सी यू मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कारखान्यातील दुर्घटनेचा पुढील तपास बोईसर पोलिस ठाणाध्यक्ष शिरीष पवार आणि पोलिस उपनिरीक्षक विकास नाईक करीत आहेत.






















