तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर:- बोईसर-पालघर पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेतील विद्यार्थांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत लेझीमच्या गजरात केले. दि १/८/२०२५ रोजी सकाळी ११-३० वाजता कार्यक्रम पार पडला. समाजसेवा, पर्यावरण संरक्षण व शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी कार्यरत बोईसर-पालघर पत्रकार संघ (रजी.) यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुताड पाडा (केंद्र-चहाडे) जिल्हा पालघर येथे वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकार संघातर्फे शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला गेला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपाध्यक्ष के. एस. हेगाजे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले व त्याच्या उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकी चे या कार्यक्रमात त्यांनी कौतुक केले. विषेश पाहुणे म्हणून उपस्थित पालघर जिल्ह्याचे सरकारी कामगार अधिकारी गोपाळ पाटील यांनी वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमामुळे पर्यावरणाची जनजागृती वाढते असे सांगून शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप केल्या बद्दल पत्रकारांच्या या सामाजिक योगदानाबद्दल प्रशंसा केली. माजी पंचायत समिती सदस्य व श्रीराम शैक्षणिक संस्था, चहाडे उपाध्यक्ष राजेश, अधिकारी यांनी ग्रमिण भागातील पत्रकारांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करताना गरजूंपर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या काळात निर्भिड व निःपक्षपाती पत्रकारांची गरज त्यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सुरूवात पुलवामा दहशतवादी हल्ला, अहमदाबाद विमान दुर्घटना आणि ” पालघर की आवाज”या वृत्तपत्राचे दिवंगत संपादक के. व्ही. नारायणन यांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. गिरनोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा माळी, यांनी पत्रकार संघाचे आभार मानून भविष्यात ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे उपक्रम राबवावेत अशी विनंती केली. पालघर नगरपरिषद अग्निशमन विभागाचे लिडींग फायरमन जयेश भोईर यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमनाच्या प्राथमिक उपाययोजना शिकवून प्रत्याक्षिक दाखविले. पत्रकार संघाचे महासचिव मोहन म्हात्रे यांनी संघाच्या समाजोपयोगी वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय घरत सर यांनी केले. शाळेच्या शिक्षिका प्रितम वर्तक व सुवर्णा धनू यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत केले. मुख्यध्यापिका स्मिता तलवार यांनी
पत्रकार संघाचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नमिता माळी, ग्रापंचायत सदस्या कमला जाधव व जगदीश धापशी बोईसर ग्रापंचायतीचे माजी सरपंच काशीराम वळवी, पालघर जिल्हा महिला काॅंग्रेसच्या महासचिव जयंती महतो, राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे रोहित सिंह “जगत भारती” चे संपादक व मिडिया असोसिएशन चे अध्यक्ष आशाद बन्ने शेख पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मान्यवर उपस्थित होते






















