नीता राऊत.
तालुका प्रतिनिधी.पालघर.
पालघर तालुक्यातील मुरबे ह्या ठिकाणी प्रस्तावित जेएसडब्लू(जिंदाल) कंपनीचे नियोजित मुरबे बंदर उभारणी च्या अनुषंगानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी जनसुनावणी आयोजित केली होती. येणाऱ्या प्रास्ताविक बंदराच्या जनसुनावणी दरम्यान उपस्थित नऊ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी जोरदार विरोध नोंदवला.सुनावणी दरम्यान अनेकदा बंदर विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड ह्यांच्या अध्यक्षते खाली ही जनसुनावणी आयोजित केली होती.आरोग्य,रोजगार,सुरक्षितेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असता ,त्याची नोंद घेतली असून ती केंद्र आणि राज्याच्या समितीकडे पाठवण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड ह्यांनी सांगितले.स्थानिकांना शंभर टक्के रोजगार,आरोग्य सुविधा देण्यात येतील.त्यांच्यावर अन्याय होणार नाही,नुकसान होणार नाही.असे जेएसडब्ल्यू च्या वतीने सुहास देशपांडे यांनी स्पष्ट केले.काळे शर्ट,स्कार्फ,ओढण्या ह्यांना मज्जाव केल्यामुळे अनेक महिला मुलींना त्यांच्या काळया ओढण्या काढून त्यांना आत प्रवेश दिला गेला ह्याबद्दल महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
























