तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर:-पालघर जिल्ह्यातील क्रिएशनच्या उत्तरा ताई माने दहा वर्षांच्या दैदिप्यमान व यशस्वी आयोजना नंतर स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाऊंडेशन च्या सहकार्याने या वर्षापासून प्रथमच आपल्या साठी घेऊन आल्या आहेत ” श्रावण महोत्सव ” दि.१/८/२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता सुगरणींसाठी विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे कै. मधुसूदन निळकंठ दांडेकर सभागृह येथे भव्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विषय :- सकाळचा न्याहारी चा पदार्थ स्पर्धाकांनी घरुन बनवून आणून त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात यावी . तसेच न्याहारी चा पदार्थ शाकाहारीच असावा असे असल्यामुळे स्पर्धकांनी उत्कृष्ट पध्दतीने मनमोहक अशी मांडणी त्या ठिकाणी केली होती. या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकत होते. न्याहारी चा पदार्थ बनवणारा मुलगा, मुलगी, महीला, पुरुष, प्रौढ, वृध्द सर्वांनीच भाग घेतला होता. स्पर्धकांनी उत्कृष्ट न्याहारी चा पदार्थ तयार करून आणला होता. त्या पदार्थांची आकर्षक मांडणी करून व त्या पदार्थांची अत्याभूत माहिती दिली. या स्पर्धेत स्पर्धकांसाठी अपेक्षा पौष्टिक, सकस, स्वादिष्ट, चवदार देणारा न्याहारी चा नाविन्यपूर्ण शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पाककला स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमासाठी विषेश सहकार्य:-डाॅ.ज्योती ताई ठाकरे यांचे लाभले. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या स्पर्धेत पाच विजेत्या ठरल्या आहेत. त्या विजेत्यांची नावे :-सौ.सुचिता नाईक, सौ. जुई राऊत, सौ. अमिता पामाले, सौ. मिनल घरत, सौ. विभूती चंपानेरकर यांनी स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यांची निवड अंतिम फेरीत झाली असून त्यांना पुढील वाटचालीसाठी स्पर्धेत जमलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.






















