नीता राऊत.
तालुका प्रतिनिधी
पालघर.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील विराज प्रोफाईल कंपनीत सोमवारी (ता.२५)रोजी टायरचा स्फोट होऊन मुजाहिद शेख.वय ५८ ह्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला.ह्या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कामगारांच्या सांगण्यानुसार कंपनीत असणाऱ्या टायरच्या दुकानात कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत असताना अचानक स्फोट होऊन टायरची लोखंडी रिंग डोक्याला लागून सदर कामगाराचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.























