तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
शासकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भाताने (खानिवडे) तालुका वसई येथे कै. जसवंत नरोत्तमदास शेठ यांच्या स्मणार्थ विज्ञान प्रयोग शाळेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दि. ६/८/२०२५ रोजी शासकीय प्राथमिक आश्रम शाळा भाताने (खानिवडे) ता. वसई येथे कार्यक्रम संपन्न झाला. कै जसवंत नरोत्तमदास शेठ यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यिक श्री. रमेश पांडुरंग तांबे यांनी आपल्या बहारदार कवितांद्वारे विद्यार्थांचे प्रबोधन तसेच मनोरंजन केले. ध्यास प्रतिष्ठान चे सचिव संजय कमल पासलकर यांनी अंधश्रद्धा न मानता वैज्ञानिक दृष्टिकोन जपावा व वाढवावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कळकळीचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक योगेश भामरे यांनी केले. श्री. महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मनोहर डोंगरे जगताप यांनी प्रस्तावना केली. श्री. अशोक वासुंबे यांनी थोरा-मोठ्यांचे विचार विद्यार्थ्यांन समोर मांडले. मा. राजेश पाटील यांनी ध्यास प्रतिष्ठान या संस्थेचे कौतुक केले व त्यांच्या कार्यक्रमांचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार मानले.






















