निता राऊत.
तालुका प्रतिनिधी पालघर.
दिनांक ८जुलै २०२५ रोजी तारापूर औद्योगिक वसाहती मधील शत्रूंजय डाइग एंड विविंग लिमिटेड प्लॉट नं डी /१ ह्या कारखान्यात साईलोक नगर येथील अभिलाषा दीपक आचार्य (वय२८)ह्या तरुण महिलेचा कामावर असताना सर्पदंशाने मृत्यू झाला.कंपनीतील अधिकाऱ्यांनी तिला प्रथम टीमा हॉस्पिटल व नंतर वरद हॉस्पिटलमध्ये नेले परंतु उपचारा आधीच तिचा मृत्यू झाला होता.मृत महिलेला बारा वर्षाच्या आतील तीन लहान मुले आहेत.तिच्या पतीने कंपनीवर निष्काळजी व बेजबदारीचा आरोप करत आर्थिक भरपाईची मागणी केली आहे.पुढील तपास बोईसर पोलिस करत आहेत.ह्या घटनेमुळे बोईसर परिसरात कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.






















