नीता राऊत.
तालुका प्रतिनिधी
पालघर.
आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक टी/१५० मधील आरती ड्रग्स कंपनीत हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या टाकीला भेग पडल्यामुळे झालेल्या गळतीने वायू हवेत पसरून लगतच्या स्थानिक नागरिक व कामगारांना घशात व डोळ्यांना जळजळण्याचा त्रास होऊ लागला. कंपनीलगत च्या सालवड व शिवाजी नगर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कंपनीच्या गेट वर शेकडो नागरिक जमा होऊन आक्रोश करत होते. एमपीसी अधिकारी,बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक,ठाणे प्रभारी शिरीष पवार तसेच अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.























