तारा पाटील.
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर :- पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील साने गुरुजी कथा मालेचे जेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. तुळशीदास तांडेल यांनी वयाची नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने तुळशीदास तांडेल यांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल मा. सुधाताई बोडा यांनी लिहिलेला लेख “साधना साप्ताहिकात” प्रसिध्द झाला. अमृत महोत्सवा निमित्त, श्री. तांडेल यांना गौरवण्यात आले व गौरव निधी देण्यासाठी आवाहन देखील या लेखात करण्यात आले. मा. सुधा बोडा यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. संकलीत निधी समारंभपूर्वक देण्याचे ठरविण्यात आले. ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेला हा समारंभ प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता त्यामुळे पुढे ढकलावा लागला होता. दि १३/१०/२०२५ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ” साधना साप्ताहिकाच्या” कर्यालयात जेष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. मिलिंद पाटील यांच्या हस्ते रु. २,६३,१०१/- एवढा गौरव निधी प्रदान करण्यात आला. कथामाला, विविध शाळा व वाचनालयातून उर्वरित आयुष्यात कार्यरत राहण्याचा संकल्प मा. श्री.तुळशीदास तांडेल यांनी केला. या कार्यक्रमासाठी “साधना साप्ताहिकाचे” संपादक विनोद शिरसाठ, राजेंद्र बहाळकर, उपेंद्र टण्णू, पुष्पा क्षिरसागर, वंदना वैद्य, या साधनेतील सर्व कार्यकर्ते व अन्य मान्यवर व ग्रामस्थ या कार्यक्रमात उपस्थित होते.
























