तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर:-जव्हार तालुक्यात दि ६/८/२०२५ रोजी आदिवासी भागात ग्राहकांना विश्वासात न घेता शेती कामासाठी हे ग्रामस्थ बाहेर गेले असता कंपनीच्या कंत्राटदारांनी कोणत्याही सूचना न देता सदरचे चालू मीटर्स काढून नवीन स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. याबाबत दि. ६ /८/२५ रोजी काँग्रेस पक्षाच्या ५० लोकांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन तालुक्यातील समस्यांबाबत दिलेल्या निवेदनावर उपविभागीय अधिकारी नाशिककर यांच्या बरोबर चर्चा केली. यावेळी किसान काॅंग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष पराग पष्टे आदिवासी आघाडीचे माजी प्रदेशाध्येक्ष व जिल्हयाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बळवंत गावीत, पालघर जिल्हा आदिवासी आघाडी अध्यक्ष अशोक पाटील, तालुकाध्यक्ष संपत पवार, महिला तालुकाध्यक्ष पार्वती ताई जाधव , राम कडाळे, वैशाली ताई कोरडे, पांडुरंग बरंतड, शैलेश कामडी, शंकर, इलात आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने आदिवासी भागात जबरदस्तीने लावलेले मीटर ताबडतोब काढून पूर्वीचे मीटर बसविण्यात यावे अशी मागणी केली, ही मागणी मान्य न झाल्यास तालुक्यातील दहा हजार स्मार्ट मीटर काढून जिल्हा कार्यालयात लाॅंग मार्च द्वारे जमा करण्यात येतील असा इशारा दिला आहे. तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करणे.ग्राहकांना वीज बिल वेळेवर वितरित करणे. रायतळे येथील ट्रांसफार्मर दुरुस्त करणे .१३२ उपकेंद्रे तातडीने कार्यन्वित करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकी नंतर कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या मिटींग मध्ये शेतकरी कष्टकरी व आदिवासींचे प्रश्न घेऊन जव्हार ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाॅंग मार्च द्वारे स्मार्ट मीटर फाॅरेस्ट प्लाॅट कर्ज माफी खावटी अनुदान व खावटी कर्ज व अन्य प्रश्नांसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.






















