तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर :- अनेक वर्षांपासून आदिवासींचे प्रलंबित वन दावे निकाली काढावे म्हणून लाल बावट्याच्या बिऱ्हाड आंदोलनात यश. वन दावे निकाली काढल्याने मध्ये रात्री आंदोलन स्थगित. वन पट्टया साठी भारताचा माकर्सवादी लेनिन लाल बावटा पक्षाने बोईसर फाॅरेस्ट कार्यालयावर दि. २५/६/२०२५ जून पासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात केली होती. बोईसर एसटी डेपोतून सकाळी दोन दोन च्या रांगेत शिस्तबद्ध पध्दतीने मोर्च्याला सुरुवात झाली. यावेळी सहभागी आदिवासी महिला , पुरुषांनी डोक्यावर लाकडाचे भारे घेऊन कांदे, बटाटे, तांदूळ स्वंयपाकाचे सर्व साहित्य घेऊन हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. वन विभागावर मोर्चा धडकताच पोलीस व वन विभाग अधिकारऱ्यांची तारांबळ उडली होती. मोर्च्याचे स्वरुप आक्रमक होते पण थोड्याच वेळात सभेत रूपांतर झाले. राज्य सचिव काॅ आदेश बनसोडे, जिल्हा सह सचिव काॅ भगवान म्हणणे, डहाणू तालुका कमिटी सदस्य काॅ वामन किंडरा, काॅ किरण डुबला, यांचे जोरदार भाषणे झाली. भाषणातून वन विभागाला चांगलेच धारेवर धरले. काॅ सिता जाधव लोकशाही महिला संघटना जिल्ह्याधक्ष काॅ भारती गुजर, काॅ अरूणा मुकणे, यांनी परिस्थितीवर आधारित आंदोलनांची गाणी गात आंदोलनाची शोभा वाढवली. तसेच शिष्टमंडळ वन प्रशासनाने वन चर्चा केली. दोन दिवसांत तुमचे वन दावे निकाली काढू असे आश्वासन देण्यास तयार होते परंतू आम्हाला आश्वासण नको अमलबजावणी हवी अशी भूमिका लाल बावटा पक्षाने स्पष्ट मांडली. प्रशासन कामाला लागले. डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंढरी पाटील, ग्रामसेवक, सरपंच, वनहक्क समिती यांना घेराव घालण्यात आला होता. आदिवासी कार्यकर्त्यांनी चुली पेटवल्या तेव्हा प्रशासन कामाला लागले. अशातच पावसाने जोरदार हजेरी लावली. पेटत्या चुलीवर छत्र्या धरून स्वयपाक करण्यात आला. खूप जोरदार पाऊस व वारा असून ही आंदोलन कर्त्याने निर्धार ठामपणे ठेवल्याने प्रशासनाला त्यांच्या पुढे झुकावे लागले. सर्व प्रलंबित वन दाव्यांची पुर्तता करून मध्ये रात्री प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आल्याने रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कमिटीने घेतला. पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना मोठे सहकार्य केल्याने बोईसर पोलीस निरीक्षक पवार ह्यांचे आभार दाभोण गावाचे कमिटी सचिव काॅ रामजी बरड यांनी मानले






















