तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर:- पालघर जिल्ह्यातील भिवंडी तालुका गणेशपुरी येथील श्री, गाडगेबाबा आश्रम शाळा भिवाळी येथे ‘जागर सावित्रीचा’ हा कार्यक्रम दि. २६/७/२०२५ रोजी सकाळी पार पडला. श्री गाडगेबाबा आश्रम शाळेतील ग्रंथालयासाठी कै. सुरेश भगवान गावडे यांच्या समानार्थ पुस्तक भेट देण्यात आली. आर्थिक सहाय्य सौ. देवयानी कदम माध्यम ध्यास प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात कै. सुरेश भगवान गावडे यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून श्रध्दांजली व दिप प्रज्वलीत करून समारंभास सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने तारपा नृत्य सादर करुन पाहुण्याचे स्वागत केले. श्री. संजय कमलाकर पासलकर सर यांनी स्वरचित कवितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. श्री. अशोक वासुदेव सर यांनी थोरा-मोठ्यांच्या विचारांचे महत्व विद्यार्थ्यांना विशद केले. श्री. गाडगेबाबा आश्रम शाळेचे भिवाळी चे संचालक श्री. अनिलजी आवटे, शाळेचे मुख्याध्यापक अनिल पदवीने, चंद्रकांत चौधरी, शिंबरे सर, मस्के मॅडम, सोनाली मॅडम, उईके मॅडम, पाटील मॅडम, अधिक्षक सविता पाटील, चौधरी मॅडम, जितेंद्र पाटील, नामदेव कानडे, अधिक्षक सुर्वे सर सर्व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. सुत्रसंचालन:-दिनेश तायडे सर यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक, अनिलजी आवटे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.






















